आपल्या अकोले नगरीत सिनियर डिव्हिजन कोर्ट येत आहे.

 आपल्या अकोले नगरीत सिनियर डिव्हिजन कोर्ट येत आहे. 



हि गोष्ट संपूर्ण अकोले करांसाठी खूप महत्वाची आहे. यापूर्वी मोठे दिवाणी दावा व काही क्रिमिनल केसेस या संगमनेर न्यायालयात जात असत परंतु आता त्या केसेस अकोले मध्ये नोंद घेत जातील. तसेच पूर्वीचे ५०० ते ६०० प्रलंबित दावे हे आता अकोले ला वर्ग करण्यात येतील. या सर्व गोष्टींमुळे आता आपल्या हक्काच्या न्यायासाठी दूर जाण्याची गरज नाही. 

सध्या राजूर आणि अकोले इथे कनिष्ठ दिवाणी व फौजदारी न्यायालय आहे आणि आता अकोले इथे अजून एक कोर्ट म्हणजे वरिष्ठ दिवाणी फौजदारी न्यायालय चालू होणार आहे. साधारणतः वरिष्ठ न्यायालय हे जानेवारी २०२६ मध्ये चालू होण्याची श्यक्यता आहे.

Post a Comment

Post a Comment